राज्याचे आरोग्यमंत्री वायसीएम रुग्णालयात; स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाययोजनांचा घेतला आढावा

197

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी मंगळवारी (दि. २८) भेट दिली. त्यांनी स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला.

शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळल्यामुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी स्वतःहून वायसीएम रुग्णालयाला भेट देत स्वाइन फ्लू प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. स्वाइन फ्लूबाबत स्टँडर्ड प्रोटोकॉलचे पालन होते किंवा कसे याचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच त्यांनी रूगणालयाच्या अतिदक्षता विभागाला भेट दिली व पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याच्या तयारीचा आढावा घेतला.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, डॉ. प्रदिप औटी, डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.