राज्याची ‘ब्ल्यू प्रिंट’ कोणी वाचतच नाही; राज ठाकरेंची खंत

70

बीड, दि. ३१ (पीसीबी) – मी ज्यावेळी राज्याची ब्ल्यू प्रिंट असावी असे सांगायचो, त्यावेळी प्रत्येक वेळी मला खोचकपणे विचारलं जायचं ब्ल्यू प्रिंट कुठे, ब्ल्यू प्रिंट कुठे?… आणि मी ब्ल्यू प्रिंट सादर केल्यानंतर मात्र ती वाचायचेदेखील कष्ट कुणी घेतले नाहीत अशी खंत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण देशात कुठल्याही राज्यानं ब्ल्यू प्रिंट आखल्याचं उदाहरण नाही, फक्त मनसेनं अशी ब्ल्यू प्रिंट सादर केल्याचं व त्यात आपल्याला अपेक्षित असलेला सगळा कार्यक्रम असल्याचं ठाकरे म्हणाले.