राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत चिंबळीच्या श्री समर्थ स्कूल आणि काॅलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

197

पिंपरी,दि.२०(पीसीबी) – एस एम जोशी कॉलेज हडपसर येथे राज्यस्तरीय नृत्यमल्हार नृत्य स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चिंबळी येथील श्री समर्थ स्कूल आणि काॅलेज च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास १८ संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेला प्रेक्षकांचा सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभला. श्री समर्थ स्कूल आणि कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी ‘केसरीया’ या गाण्यावरती नृत्य सादर केलं, या मध्ये १८ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या नृत्याचे दिग्दर्शन रोहित कदम यांनी केलं आणि मार्गदर्शन प्रा. सुरज सोमवंशी यांनी केले.

यावेळी स्कूल आणि कॉलेजचे संस्थाचालक श्री शिवाजीराव गवारे व सचिव सौ. विद्या गवारे यांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डान्स कोरिओग्राफर रोहित कदम आणि स्कूल आणि कॉलेजचे शिक्षक सुरज सोमवंशी यांनी सत्कार स्वीकारला.

दरम्यान, स्कुल आणि कॉलेजच्या प्राचार्य अनिता टिळेकर यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्या दिल्या.