राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

106
दिल्ली, दि.२५ (पीसीबी) – निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. १७ राज्यांमधील राज्यसभेच्या ५५ सदस्यांच्या जागा भरण्यासाठी २६ मार्च रोजी द्विवार्षिक निवडणुका होणार आहे. राज्यसभेच्या या जागांवरील सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपणार आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती देण्यात आली.
राज्यसभेतून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रामदास आठवले, भाजप समर्थक अपक्ष खासदार संजय काकडे यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या सात जागांसह देशातील ५५  जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे.