राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न

133

पुणे, दि. १७ (पीसीबी) – वानवडी येथील परमारनगरमध्ये असलेल्या राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फ्लॅटचा कडी-कोयंडा कापून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज शुक्रवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास राज्यमंत्री दिलीप कांबळे हे राहत असलेल्या वानवडी येथील परमारनगरमधील फ्लॅटचा कडी-कोयंडा कापून अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र चोरट्यांच्या हाती काही लागल नाही म्हणून त्यांनी बिल्डींग मधील अण्य दोन फ्लॅट देखील फोडले आहेत. हा प्रकार आज एका घरकाम करणाऱ्या महिलेला कळाला. त्यानंतर याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान राज्य मंत्र्यांच्या घरी चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. तसेच अशा प्रकारे जर राज्यमंत्र्याचे घर सुरक्षीत नसेल तर सामान्य नागरिकांच्या घराचा सुरक्षेचा काय असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.