राज्यपालांच्या हस्ते राज्यातील २८ महिला डॉक्टरांना ‘मेडीक्वीन एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

95

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील २८ महिला डॉक्टरांना रविवारी (दि. ५) राजभवन येथे ‘मेडीक्वीन एक्सलन्स’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या मेडीक्वीन या संस्थेतर्फे महिला डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला मेडीक्वीनच्या संस्थापिका डॉ प्रेरणा बेरी – कालेकर, गोवर्धन इको व्हिलेजच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रम प्रमुख डॉ संध्या सुब्रमण्यन व मेडीक्वीनच्या सचिव डॉ प्राजक्ता शाह उपस्थित होत्या. राज्यपालाच्या हस्ते यावेळी डॉ. मनिषा गरूड (पिंपरी चिंचवड), रितू लोखंडे (पुणे), डॉ.ज्योती माटे (पुणे) यांच्या सह ठाणे कोल्हापुर लातूर अकलूज चंद्रपूर नागपुर मुंबई च्या महिला डाक्टर
चा गौरव करण्यात आला.
डॉक्टर मनीषा गरुड यांचा राज्यपालांच्या हस्ते सलग दुसऱ्यांदा सत्कार झाला आहे मागे आरोग्य सन्मान पुरस्काराच्या त्या जुरी होत्या