राजस्थानात गो तस्करीच्या संशयावरून तरुणाची हत्या

50

जयपूर, दि. २१ (पीसीबी) –  राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील रामगड भागात जमावाने गो तस्करीच्या संशयावरून एका २८ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. अकबर खान असे या तरुणाचे नाव असून तो हरयाणातील कोलागावचा रहिवासी आहे.

अकबर शुक्रवारी रात्री त्याच्या मित्रासह दोन गायी घेऊन लल्लावंडी गावाजवळून  जात होता. यावेळी काही गावकऱ्यांनी  त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत अकबर गंभीर जखमी झाला.

त्यानंतर पोलिसांनी अकबरला रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच  त्याचा मृत्यू झाला. अकबरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, अकबरच्या हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.  त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे  अल्वर पोलिसांनी सांगितले .