राजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याचे उघड

2174

खेड, दि. १८ (पीसीबी) – राजगुरूनगर येथून स्वातंत्र्यदिनी मित्रांसह मैदानावर खेळताना गायब झालेल्या मुलाचा खून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

सुमित रविंद्र सावंत (वय १०, रा. राजगुरूनगर) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी रविंद्र सावंत यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर, संशयिताने सुमितचे अपहरण करून त्याला चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित हा राजगुरू विद्यालयाच्या मैदानात खेळत असताना बुधवारी (दि. १५) दुपारच्या सुमारास गायब झाला होता. या प्रकरणी सुरूवातीली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत एका संशयिताला ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबूली दिली. अवघ्या १० वर्षाच्या मुलाचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. खेड पोलिस तपास करत आहेत.