रांजणगाव पोलीस ठाणे हद्दीतील पाच सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई

103

पुणे, दि. ८ (पीसीबी) – रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी व परिसरात मारामारी व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी एका वर्षासाठी तडीपार केले आहे.

संकेत मारुती कर्डील (वय १९, रा. कारेगाव), मयुर बाळू शेळके (वय २२, रा.कर्डेलेवाडी), अजय शिवाजी गवारे (वय २५, रा. कारेगाव), मारुती बाळू करगडे (वय २४, रा.कर्डेवाडी) आणि सचिन बबन आबनावे (वय ३२, रा. कारेगाव) असे तडीपार करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तडीपार करण्यात आलेल्या पाचही आरोपींवर रांजणगाव एमआयडीसी आणि कारेगाव येथे मारामारी, गुंडगिरी केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर वचप बसावा या करीता पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी आरोपींना एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.