रांजणगावमध्ये विरुध्द दिशेने आलेल्या भरधाव टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू

109

पुणे, दि. १६ (पीसीबी) – रांजणगाव येथील हॉटेल गितांजली जवळ विरुध्द दिशेने आलेल्या एका भरधाव टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.१५) रात्री दहाच्या सुमारास घडली.

प्रवीण प्रभाकर जाधव (रा. पाबळ ), विशाल राजाराम खांदवे (रा. हवेली), सुनील बबन शिंदे (रा. थिटेवाडी, केंदूर ) असे मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर गणेश अंकुश थिटे ( रा. थिटेवाडी , केंदूर ) हा गंभीर जखमी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री दहाच्या सुमारास प्रवीण, सुनील आणि गणेश हे तिघे आपल्या (एम.एच/१२/जे.टी/९०९०) या दुचाकीवरुन शिरुरहून शिक्रापुरच्या दिशेने जात होते. तर विशाल  हा त्याच्या दुचाकीवरुन मागून येत होता. यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या (एम.एच/१२/ एस.डी/३५९४) या टेम्पोने या चौघांना जोरदार धडक दिली. यामध्ये प्रवीण, विशाल आणि सुनील या तिघांचा मृत्यू झाला तर गणेश हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. शिक्रापूर पोलिस तपास करत आहेत.