रहाटणीत सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

778

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – मुलाच्या लग्नात सुनेच्या आई-वडिलांनी मानपान दिला नाही म्हणून सासरकडच्या मंडळींनी सुनेचा शारीरीक आणि मानसिक छळ करुन तिला नाहक त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार गजानन नगर रहाटणी येथे घडला.

पूनम महावीर वाळके (वय २७, रा सहकार कॉलनी नंबर एक, ज्योतिबा नगर, काळेवाडी) असे पिडीत विवाहित तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती महावीर रामदास वाळके (वय २८), सासू सीमाबाई रामदास वाळके (वय ४५), सासरे रामदास सीताराम वाळके (वय ५५) आणि दिर हनुमंत रामदास वाळके (वय २६, सर्व रा. गजानन नगर, रहाटणी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम आणि महावीर या दोघांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. परंतु लग्नामध्ये पूनम यांच्या आई-वडिलांनी महावीर याच्या आई-वडिलांना मानपान दिला नाही. तसेच त्यांना दोन मुली झाल्या या कारणावरून सासरची मंडळींनी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. यावर पूनम यांनी वाकड पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानुसार  पती, सासू, सासरे आणि दिर या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.