मध्यरात्री घरात घुसून जबरदस्ती करणाऱ्या आरोपीच्या तावडीतून  सुटका करुन घेण्यासाठी एका  महिलेने घराच्या गॅलरीमधून खाली उडी मारली. ही धक्कादायक घटना गुरूवारी (दि.५) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास रहाटणीतील महाराष्ट्रनगर येथे घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत अज्ञात आरोपी तिच्या घरात शिरला व तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यास विरोध केला.  त्यानंतर या   महिलेने खाली उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर उडी मारली. त्यात ती  गंभीर जखमी झाली आहे.  तिला रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये महिलेचा उजवा पाय फॅक्चर झाला आहे.

वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.