रहाटणीत कोयते तलवारींनी टोळक्यांकडून कुटुंबाला मारहाण; घराची नासधुस, कारची केली तोडफोड

118

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – आठ ते दहाच्या जणांच्या टोळक्यांनी घरात घुसून एकाच कुटुंबातील लोकांना कोयता, तलवारी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड करुन कारचेही नुकसान केले. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रसन्न कॉलनी, रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी अजित निकम यांनी वाकड पोलिसांना माहिती दिली आहे.

अजित निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते प्रसन्न कॉलनी, रहाटणी येथे राहतात. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास साईनाथ कांबळे, आनंद कांबळे, संदिप गोलप, विशाल गायकवाड, निलेश गायकवाड, सुमित गाडे, प्रविण देवकर, कुणाल देवकर आणि आदर्श गुंड हे नऊ जण हातात तलवारी, कोयते आणि लोखंडी रॉड घेऊन निकम यांच्या घरात शिरले आणि घरातील सामानाची तोडफोड केली. घरातील लोकांना त्यांचा विरोध केला असता त्यांनी घरातील लोकांना मारहाण करुन घरा बाहेर उभी असलेली त्यांची मारुतीसुझुकी झेण कारची तोडफोड केली. निकम यांनी याबाबत वाकड पोलिसांना कळवले आहे. वाकड पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.