रहाटणीतील लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलमध्ये रंगला पालखी सोहळा

93

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – रहाटणी येथील लिटिल फ्लावर नर्सरी स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानोबा माऊली…तुकारामच्या जयघोषाने परिसर आनंदी व भक्तिमय झाला होता.

विद्यार्थी वारकऱ्यांच्या पेहरावात या भक्ती सोहळ्यात सहभागी झाले होते. वारकरी व विठ्ठल रुक्मिणीचा वेष परिधान केलेले चिमुकले लक्ष वेधून घेत होते. गळ्यात तुळशी माळ, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ, मृदुंग तर मुलीच्या डोक्यावर तुळशी वृंदावन व मुखातून ज्ञानबा तुकारामांच्या नावाचा जयघोष यामुळे शाळेचा सर्व परिसर भक्तिमय झाला होता.

मुख्याध्यापिका अनिता जांभळे यांच्या हस्ते ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नीता सोनवणे, शिल्पा पंडित, वैशाली चौधरी, सुरेखा गायकवाड, शीला झोडगे, उज्वला ढवळे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.