रहाटणीतील बळीराम ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

60

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – रहाटणी येथील बळीराम ज्येष्ठ नागरिक संघाचा चौथा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

रहाटणीतील बळीराम मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. शारदा मुंडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी संघाचे संस्थापक नरेश खुळे, नगरसेविका सविता खुळे, अंकुश राजवाडे, गोविंद तांबे, सुदाम कापसे, अध्यक्ष महादेव यादव, कार्याध्यक्ष रामदास दिघे, कार्यवाह रमेश भावसार, कोशाध्यक्ष मनोहर सपकाळ, तानाजी नवलडे आदी उपस्थित होते.