रहाटणीतील ‘त्या’ बसचालकाचा खून अवघ्या ८०० रुपये आणि ‘मेमरी कार्ड’साठी

1302

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – रहाटणी येथे एक महिन्यापुर्वी खाजगी बसमध्ये चालकाचा हत्याराने वार करून करण्यात आलेल्या खुनाचा गुढ उकलले. उसने घेतलेले ८०० रुपये आणि मोबाईलचे मेमरी कार्ड दिले नाही म्हणून मित्रानेच खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पवन उर्फ ‌अनिल रमेश सुतार (हिरे) (वय ३९, रा. चिंबळी, ता. खेड) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. तर अनिल श्रावण मोरे (वय ३९, रा. सायली पार्क, रहाटणी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै रोजी सकाळी सव्वा आठच्या सुमारास दयानंद एजन्सी जवळ श्रीनंदा क्लासिक, शिवशाही हॉटेल समोर पवन यांनी त्यांची खाजगी बस उभी केली होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने पवनच्या डोक्यात हत्याराने ३४ वार केले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील १७० चालक आणि नागरिकांची तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर पोलिसांना पवनचा सुतारकाम करणारा मित्र अनिलची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता केवळ उसने दिलेले ८०० रुपये आणि मोबाईल फोनची मेमरी कार्ड परत न केल्याने पवनचा खून केल्याची त्याने कबूली दिली. वाकड पोलिस तपास करत आहे.