रस्त्यात महिलेचा विनयभंग करणाऱ्यास देहुरोड येथे अटक

118

देहूरोड, दि. ११ (पीसीबी) – रस्त्याने चालत जाणाऱ्या महिलेसमोर अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग करणाऱ्या एकाला अटक करण्यात आले. ही कारवाई देहूरोड पोलिसांनी केली.

या प्रकरणी शिवराम हिरन्ना भंडारी (वय ५० रा. चिंचोली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. आरोपीविरीध्द २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी (दि.१०) फिर्यादी महिला देहुरोड बाजारातून हॉटेल अशोकजवळून चालली होती. यावेळी आरोपी भंडारी तेथे आला. आणि महिलेसमोर अश्लील हावभाव करून विनयभंग केला. देहुरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर अधिक तपास करत आहेत.