रस्त्याच्या बाजूला फोनवर बोलत थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल पळवला; दोघांना अटक

143

चाकण, दि. १३ (पीसीबी) – फोन आल्याने रस्त्याच्या बाजूला दुचाकी थांबवून फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना 6 जानेवारी रोजी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास खराबवाडी येथे घडली. पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे.

राजू बापूराव देशमुख (वय 19, रा. नाणेकरवाडी, चाकण), आदर्श आप्पा शेंडगे (वय 19, रा. खराबवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी दिनकर मारुती सावंत (वय 33, रा. खराबवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी रोजी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी खराबवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळून जात होते. त्यावेळी त्यांना फोन आला म्हणून दुचाकी बाजूला घेऊन ते फोनवर बोलत थांबले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. चाकण पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुखे तपास करीत आहेत.