रस्ता ओलांडत असताना दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

24

बावधन, दि. २१ (पीसीबी) – भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्यामुळे पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 20) सकाळी बावधन येथे घडली.

कन्हैया किसन परदेशी (वय 78, रा. जुनी सांगवी) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सिद्धांत सुनील शुक्‍ला (वय 21, रा. बिळेवस्ती, बावधन) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर या अपघातात रवीकुमार मल्लीकुमार मडीवाळ (वय 20, रा. औंध हॉस्पिटलजवळ, नवी सांगवी) हा दुचाकीवरील सहप्रवासीही जखमी झाला आहे. गौरव नितिन वाघ (वय 27, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास मयत परदेशी हे सारस्वत बॅंक, एनडीए रोड, बावधन येथे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आरोपी शुक्‍ला याच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांचा मृत्यू झाला. तर मडीवाळ यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare