रवीराज काळे यांच्यातर्फे निगडी पोलिस ठाण्यास सॅनीटाझजर मशीन भेट

70

निगडी, दि.१९(पीसीबी) – रविराज काळे या विद्यार्थ्याने स्वखर्चातून निगडी पोलिस ठाण्यांमध्ये ऑटोमॅटिक सैनी टायझर मशीन उपलब्ध करून दिली आहे.

जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालत असताना अनेक ठिकाणी ऑटोमॅटिक सॅनी टायझर मशिनचा वापर केला जातो. ज्यामुळे कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होऊ शकते. अशीच एक सॅनीटायझर मशीन प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील विद्यार्थी कु. रविराज काळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत निगडी येथील पोलिस ठाण्यांमध्ये स्वखर्चातून पोलिसांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

असे ऑटोमॅटिक सैनी टायझर मशीन पिंपरी चिंचवड मधील सर्व भागांमध्ये बसवण्यात आले तर कोरोणाचा संसर्ग पसरण्याचा धोका टळू शकतो, असा मानस रविराजचा आहे.

WhatsAppShare