रवींद्र मराठेंना अटक करताना पुणे पोलिसांचा आतातायीपणा – शरद पवार

90

पुणे, दि. २६ (पीसीबी) – प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना बनावट कागद पत्रांच्या आधारे कर्ज मिळवून दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे रवींद्र मराठे यांना देखील अटक केली आहे. मात्र, पुणे पोलिसांची ही कारवाई चुकीची आहे. यातून पोलिसांचा आततायीपणा दिसून येत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे पोलीस आणि गृह विभागावर टीकास्त्र सोडले.  

आज (मंगळवारी) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, बँकेच्या गैरकारभाराबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. त्यांच्या शिवाय कारवाई करण्याचा अधिकार कोणालाही नाही.

मात्र, पुण्यातील बँक अधिकाऱ्यांना अटक केल्याने पुणे पोलीस अधिक जागरुक असल्याचे दिसून आले, असा चिमटा त्यांनी काढला. या कारवाईतून पुणे पोलिसांनी कायद्याचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होत  आहे, असेही पवार म्हणाले.