रविवारी चिंचवड येथे प्रविण तरडे यांची प्रकट मुलाखत

248

पिंपरी, दि. १३ (पीसीबी)- दिशा सोशल फाऊंडेशच्या वतीने प्रसिध्द लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांची प्रकट मुलाखत हा कार्यक्रम रविवारी (१५ मे) चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. प्रसिध्द मुलाखतकार विनोद सातव हे प्रविण तरडे यांची मुलाखत घेणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अभिनेते रमेश परदेशी (पिट्या भाई), देवेंद्र गायकवाड (दया) या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष नाना शिवले (सर) यांनी प्रसिद्धीस दिली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. मात्र, काही जागा राखीव असतील. नाट्यगृहात मर्यादित आसनक्षमता असल्याने प्रथम येईल त्यास प्राधान्याने प्रवेश या तत्वाने नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार आहे.