रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

173

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – रयत विद्यार्थी विचार मंचाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंचचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे व उपाध्यक्ष संदेश पिसाळ यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

धम्मराज साळवे म्हणाले, “अण्णाभाऊ यांनी ज्याप्रमाणे अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन संपूर्ण विश्वात आपल्या लेखणीच्या माध्यमातून साहित्यक्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्याप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनीही हलाखीची परिस्थिती यशाच्या कधीही आडवी येत नाही हे लक्षात ठेवावे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे.”

महासचिव संतोष शिंदे यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, सचिव निरज भालेराव, शहराध्यक्ष रोहित कांबळे, सहसचिव समाधान गायकवाड, शहरसचिव आनंद विजापुरे, उपाध्यक्ष महेश गायकवाड, सदस्य निखिल मुरकुटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा आठवले यांनी केले.