रणवीर-दीपिकाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु

47

मुंबई, दि.२ (पीसीबी) – बॉलिवूडमधले सर्वात आवडते जोडपे दीपिका-रणवीर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. अनुष्का आणि विराटच्या पावलावर पाऊल ठेवत या दोघांनीही इटलीत विवाह करण्याचे निश्चित केले असल्याच्याही चर्चा बी टाऊनमध्ये सुरू आहेत. विशेष म्हणजे लग्नासाठी नोव्हेंबर महिना निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे १० ते १६ नोव्हेंबरच्या दरम्यान इटली आणि मुंबईत विवाहसोहळा आणि रिसेप्शन पार पडणार आहे.

रणवीर आणि दीपिकाने आपल्या टीमला नोव्हेंबरमध्ये सुट्टी न घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या दोघांसाठी काम करणारे अनेक टीम मेंमर रणवीर दीपिकाच्या सुचनेवरून नोव्हेंबर महिन्यात जादा सुट्ट्या न घेता काम करणार आहे. या महिन्यात दीपिकाने कोणत्याही ब्रँडच्या जाहिरातीसाठी वेळ न देण्याचे ठरवले आहे. तसेच कोणत्याही दिग्दर्शकाला या काळात शुटींगसाठी तारखा न देण्याचे तिने निश्चित केले आहे.

तर रणवीरदेखील नोव्हेंबरआधीच ‘सिम्बा’चे चित्रिकरण पूर्ण करणार आहे. उरलेले काम रणवीर डिसेंबर महिन्यात करणार आहे. इटलीत काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर मुंबईत मोठी रिसेप्शन पार्टी बॉलिवूड आणि इतर मंडळींसाठी आयोजित करण्यात येणार आहे.