योग लोकांना जोडण्याचे काम करतो- मोदी

82

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – आज भारतीयांसाठी गर्वाचा क्षण असून आज जगात जिथे जिथे सुर्योदय होईल तिथे लोक योग करुन सुर्याचे स्वागत करतील, असे सांगतानाच योग लोकांना जोडण्याचे काम करतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदींच्या उपस्थितीत डेहाडूनच्या वन संशोधन संस्थेत सर्वात मोठा कार्यक्रम पार पडत असून यात सुमारे ५० हजार जण सहभागी झाल्याचे सांगितले जाते.

भारतासह जगभरात आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस असून यानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहे. डेहराडूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत योगदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, डेहराडून पासून ते डबलिनपर्यंत, शांघाय पासून ते शिकागोपर्यंत आणि जकार्तापासून जोहान्सबर्गपर्यंत सर्वत्र योगच योग दिसत आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.