योग दिनाला दांडी मारणारे नितीश कुमार शिवसेनेच्या वाटेने चाललेत?

50

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सेलिब्रेशनसाठी अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपची राज्य सरकारे कामाला लागली. मात्र दुसरीकडे बिहारमध्ये एनडीएचे साथीदार  आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र या सगळ्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

आता नितीश कुमार यांची ही नाराजी केवळ योगायोग आहे की २०१९ ला पुन्हा शीर्षासन करत भाजपला झटका द्यायच्या तयारीत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

जमीन, पाणी, आकाश..योगदिनाच्या निमित्ताने भाजप सरकारने सगळ अवकाश व्यापून टाकले आहे. पण अजूनही आपल्या मित्रपक्षांच्या हृदय त्यांना काबीज करता आलेला नाही. योगदिनाच्या कार्यक्रमांना नितीशकुमार यांनी आज दांडी मारली. केवळ तेच नव्हे, तर त्यांच्या पक्षाचा कुठलाच मंत्री, पदाधिकारी या योगाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसला नाही. गेल्या आठवड्यातली ही दुसरी वेळ आहे, ज्यावेळी नितीश कुमार यांनी भाजपसोबतचे मतभेद अशा पद्धतीने जाहीरपणे उघड केलेत. दोनच दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी आपला पक्ष क्राईम, कम्युनिझम, करप्शनसोबत तडजोड करणार नाही असे विधान केलेले होते. हा इशारा होता भाजपच्या काही केंद्रीय मंत्र्यांना..जे बिहारमधले वातावरण हिंसक बनवतायत.