योग्य उपाययोजनाशिवाय प्लास्टिक बंदी नको – बाबा कांबळे

36

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – प्लास्टिक पिशवी बंदीमुळे पथारीधारक स्टॉलधारक आणि छोटे विक्रेते यांना व्यवसाय करण्यास अडचण निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्लास्टिक पिशवी बंदीनंतर योग्य उपाय आणि पर्याय व्यवस्था सरकारने केलेली नाही. सरकारने योग्य उपाययोजनेनंतर प्लास्टिक बंदी लागू करावी, अशी मागणी पथारी हातगाडी पंचायत नेते बाबा कांबळे यांनी केली.  

शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीमध्ये पथारी हातगाडी पंचायत पुणे शहर अध्यक्ष राजू पोटे, कार्याध्यक्ष डॅनियल लांडगे, नितीन शिंदे, उत्तरेश्वर कांबळे, आनंद तांबे, किरण भालेराव, प्रल्हाद कांबळे, सूर्यकांत भोसले, अभिमन्यू तिखे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.