योगेश सोमण यांची गृहमंत्र्यांवर टिका

113

पुणे, दि.२२ (पीसीबी) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सोशल मीडियातून टीका केल्यावर मुंबई विद्यापीठातील नाट्यशास्त्राचे विभागप्रमुख योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याच मुद्द्यावर सोमण यांच्यावर टीका करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी प्रत्यत्तर दिले असून मी बोलवले तर गृहमंत्र्यांच्याही मतदारसंघात अभिनय शिवायला जाईन असे ते म्हणाले.

पुण्यात शिवसेनेतर्फे एक कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘ संबंध व्यक्तींसोबत असतात, पक्षासोबत नाहीत. जर गृहमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात अभिनय शिकवायला बोलावले तरी जाईन. मी माझ्या विचारांवर ठाम असून माझे म्हणणे सत्यशोधक समितीसमोर मांडेन. आत्तापर्यंत विद्यापीठाने मला अधिकृतपणे काहीही कळवले नसून. मलाही सर्व काही वर्तमानपत्र किंवा माध्यमातून समजले. या पुढे मी अजून काही नाही बोलू शकत”.

सोमण यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या गांधींवर टीका करणारा व्हिडीओ अपलोड केला होता. त्यावर काँग्रेसकडून टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इतकेच नव्हे तर गृहमंत्री देशमुख यांनी ‘सोमण यांची या पदावर काम करण्याची पात्रता नसल्याचे सांगितले होते’. आज त्यावर सोमण यांनी टोला लगावत उत्तर दिले आहे.