योगेश भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त निगडीतील बाल उद्यानात वृक्षारोपण

41

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाचे चिटणीस योगेश भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त निगडीतील संत तुकाराम व्यापार संकुलाजवळील छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.

शिवराज मित्र मंडळ, कै. श्रीमंतभाऊ देवकाते युवा मंच आणि आदर्श मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  आले होते. यावेळी नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजु दुर्गे, भाजपचे जेष्ठ नेते दिलीप गोसावी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी आसिफ सय्यद, नाना रोकडे, रूपेश झांबरे, प्रविण कांबळे यांनी परिश्रम घेतले.