योगेशअण्णा जगताप युथ फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत

149

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हजारो हात सरसावले आहेत. चोहोबाजूंनी मदतीचा ओघ कायम असल्याचे पाहावयाला मिळत आहे. योगेश अण्णा जगताप युथ फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्यात  आली.

फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश जगताप,  पिंपरी महापालिकेचे  क्रीडा सभापती तुषार हिंगे यांनी पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीचा धनादेश आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे सुपूर्त केला.