‘योगी सरकार कोरोना व्यवस्थापनात अपयशी ठरले’; भाजप आमदाराचा आरोप

17

बलिया, दि.३० (पीसीबी) : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी शुक्रवारी कोरोना व्यवस्थापनात राज्य सरकारवर गलथान कारभाराचा आरोप करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा नोकरशाहीच्या माध्यमातून कोविड वरील नियंत्रणाचा प्रयोग अयशस्वी झाल्याचे म्हटले आहे.

बलिया जिल्ह्यातील बरिया भागातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कोविडवर नोकरशाहीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्याचा प्रयोग अपयशी ठरला आहे”. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील यंत्रणेच्या अभावामुळे भाजपचे मंत्री आणि आमदार हे कोविड मुळे बळी पडत आहेत. त्यांना योग्य वैद्यकीय सुविधादेखील मिळत नाहीत. आमदार पुढे म्हणाले, “नोकरशाही कांद्रित
प्रणाली ही उपयोगाची नसून लोकप्रतिनिधींवर केंद्रित असली पाहिजे, परंतु औषध व औषधांच्या अभावामुळे देशातील व राज्यातील भाजपचे मंत्री मरत आहेत याची मला खंत आहे. राज्यात भाजप सरकार असतानाही औषध व बेड नसल्यामुळे भाजपचे मंत्री आणि आमदार मरत आहेत.”

अलीकडेच, बरेली जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नवाबगंज विधानसभा मतदार संघाचे सदस्य केसरसिंग, लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेशकुमार श्रीवास्तव, औरैया सदरचे आमदार रमेशचंद्र दिवाकर यांचे कोविड संसर्गामुळे निधन झाले.

WhatsAppShare