योगी आदित्यनाथ यांनी घेतली संजूबाबाची भेट!

62

उत्तर प्रदेश, दि. ९ (पीसीबी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांची भेट घेतली आहे. भाजपच्या ‘जनसंपर्क अभियाना’अंतर्गत ही भेट घेण्यात आली असून यावेळी आदित्यनाथ यांनी संजय दत्त यांना सरकारच्या कामकाजाची यादी सोपवली.

योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी संजूबाबाने उत्तरप्रदेशातील एक गाव दत्तक घेण्याची इच्छा आदित्यनाथ यांच्याकडे व्यक्त केली. ‘चिलबिला’ असे या गावाचे नाव असून ते उत्तर प्रदेशातील जौनपूर रोड येथे वसलेले आहे. संजूबाबाची आई नर्गिस दत्त यांचे वडिलोपार्जित घर ‘चिलबिला’ मध्ये असल्याचे समजते.

‘उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणाने मी खूप प्रभावित आहे आणि ऑक्टोबरमध्ये माझ्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटींग मी येथेच सुरू करणार आहे.’ असे संजूबाबाने सांगितले. सध्या त्याच्या ‘प्रस्थानम’ या चित्रपटाचे शूटींग लखनऊ व त्याच्या जवळपासच्या भागात सुरू आहे.