योगदान प्रतिष्ठानतर्फे योग शिबिराचे मोफत आयोजन

93

ब प्रभाग सभापती नगरसेवक सुरेश भोईर यांचा पुढाकार

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज 21 जुन चिंचवड मध्ये योगदान प्रतिष्ठाण तर्फे योग शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. जागतिक पातळीवर योग साधनेला प्राप्त झालेले महत्व हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे.

योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच
मधुमेह मुक्त भारत, योग साधनेतुन शारीरिक व मानसिक व्याधींवर मात , योग आसनांचे प्रात्याशिक करत नागरिकांनी योग करूया निरोगी राहुया !! हा मंत्र जपत स्वस्थ आणि निरोगी आयुष्यासाठी 90 नागरिकांनी योग शिबिरात सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ब प्रभाग सभापती नगरसेवक सुरेश भोईर यांनी केले होते तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन पतंजली योग विद्यापीठाचे योगगुरू डॉक्टर अजित जगताप व लक्ष्मण जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमांमध्ये नागरिकांसोबत महिलांचाही मोठा सहभाग होता.

WhatsAppShare