येरवडा कारागृहातील बंद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन झाले खुले; पैठणी आणि राख्या मिळतात अल्पदरात

232

पुणे, दि. २२ (पीसीबी) – कळत नकळत, रागात आणि द्वेशापोटी हातून घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेल्या येरवडा कारागृहातील काही सुधरण्याची इच्छा असलेल्या बंद्यांनी फर्निचर, कपडे, कापडी पिशव्या, साड्या, बॅग, बूट, चपला, शोभेच्या वस्तू, देवघर अशा विविध वस्तू बनवून त्याचे विक्रीसाठी प्रदर्शन भरवले आहे. हे प्रदर्शन सर्वसामांन्य नागरिकांसाठी मंगळवार (दि.२१) पासून खुले करण्यात आले असून तेथे तुम्ही विविध वस्तूंची खरेदी करु शकता.

बंद्यांच्या हातांना काम मिळावे, यासाठी येरवडा कारागृहामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाअंतर्गत येरवडा कारागृहातील कैद्यांना विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्या बदल्यात त्यांना पगार ही मिळतो, वेळही गुंततो आणि सामाजीक भानही येते. यंदाच्या वर्षी बंद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तू कारागृहातील विक्री केंद्रात नागरिकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

दरम्यान, विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्यामुळे बंद्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर उर्वरीत आयुष्य चांगल्या पद्धतीने घालवण्यास मदत होते. यंदा बंद्यांनी सुमारे ३ हजार राख्या तयार केल्या आहेत.