येरवडा कारागृहातील कातिल सिद्दीकी खून प्रकरणी कुख्या गुंड शरद मोहोळची निर्दोष मुक्तता

633

पुणे, दि. २६ (पीसीबी) – संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकी याच्या खून प्रकरणी शरद मोहोळ आणि आलोक भालेराव यांची शिवाजीनगर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सिद्दीकी याचा ८ जून २०१२ रोजी येरवडा तुरुंगातील अंडा सेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता.

प्राप्त माहितीनुसार, मोहोळ आणि भालेराव यांनी मिळून संशयित दहशतवादी मोहंमद कातिल मोहम्मद जाफर सिद्दीकी उर्फ सज्जन  (रा. बिहार) याचा खून केला होता. या खटल्या दरम्यान साक्षी आणि उलट तपासणी घेण्यात आली होती. अखेर शिवाजीनगर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी  मोहोळ आणि भालेराव या दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे. कातिल सिद्दीकी हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी होता. तो इंडियन मुजाहिदीचा दहशतवादी असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले होते.