येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यावरील गोळीबार प्रकरणी पाच जणांना अटक

323

पुणे, दि. ७ (पीसीबी) – कारागृहात शिस्त आणि क़डक वागल्याने रागावलेल्या आरोपींने संगनमत करून येरवडा कारागृहातील पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मोहन पाटील यांच्यावर शुक्रवारी (दि. ६) सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यातून मोहन पाटील थोडक्यात बचावले होते.

निलेश संभाजी वाडकर (वय ३४, जंनता वसाहत), सुदर्शन संभाजी राक्षे (रा. आळंदी रास्ता, शास्त्री चौक, भोसरी), ओंकार चंद्रकांत बेणूसे (वय १९, जय भवानीनगर, जनता वसाहत) आणि कुणाल कानडे (वय १९, जनता वसाहत) अशी या प्रकरणी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिस्तप्रिय असलेले मोहन पाटील  हे कारागृहात काम करीत असताना अतिशय कडक वागत असत. ते कोणत्याही प्रकारची सुट देत नसत. निलेश वाडकर हा एका खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात असताना त्याला मोहन पाटील यांच्या शिस्तीला अनुभव आला. त्यातून रागावून पाटील यांना धडा शिकविण्यासाठी त्यांने इतरांशी संगनमत करुन पाटील यांच्या खुनाचा कट रचला होता.

त्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी पाटील जेल ओपनिंग डुयुटीसाठी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भर रस्त्यात त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांचा निशाना चुकल्याने ते खोडक्यात बचावले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. पोलिस तपास करत आहेत.