येमेनमध्ये दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार; तिघा आरोपींना भरचौकात गोळ्या घालून दिली फाशी

1571

साना, दि. १० (पीसीबी) – येमेनमधील साना येथे एका दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना भरचौकात गोळ्या घालून फाशी देण्यात आली आहे. असे गुन्हे करण्याची हिंमत कोणी करु नये, यासाठी येमेनमध्ये अशा शिक्षेची तरतूद असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येमेनमधील साना येथे एका दहा वर्षांच्या मुलावर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता.  अत्याचारानंतर त्या मुलाची हत्या करण्यात आली होती. या तिन्ही नराधमांना स्थानिक पोलिसांनी अटक केली. या तिघांनाही भरचौकात फाशीची शिक्षा देण्यात आली. मात्र, शिक्षेच्या या पद्धतीवर मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. येमेनमधील शरिया कायदा लागू असून यानुसार गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. असे गुन्हे करण्याची हिंमत कोणी करु नये, यासाठी येमेनमध्ये अशा शिक्षेची तरतूद असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.