येत्या २४ तासात ठाणे, पालघर, रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा

10

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – येत्या २४ तासात ठाणे, पालघर, आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी अधूनमधून पावसाचा हलक्या सरी सुरुच आहेत. 

समुद्राच्या उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर समुद्रकिनारी गर्दी करतात. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

गुरुवारी कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोगदार पाऊस झाला. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोगदार पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला .