यूपीच्या उन्नावमध्ये भयानक चित्र; अंत्यसंस्कार करण्याऐवजी शेकडो मृतदेह चक्क गंगेच्या किनारी वाळूमध्ये पुरले

89

उत्तरप्रदेश, दि.१३ (पीसीबी) : कोरोना काळात आणखी काय पाहायला मिळेल काही सांगता येत नाही. नद्यांमध्ये मृतदेह वाहून आल्याची घटना ताजी असतानाच आता काही भीतीदायक वास्तवतेची जाणीव करून देणारी काही चित्र समोर आलीत. येथे लोकांनी गंगा नदीच्या काठी वाळूत मृतदेह पुरलेत. शुक्लगंज हाजीपुरातील रौतापूर गंगा घाटातील वाळूतील स्मशान पाहून सर्वांनाच धक्का बसला. कोरोना साथीच्या व्यतिरिक्त इतर आजारांमुळे मृत्यू होत असून प्रशासन आकडेवारी लपवण्याच्या तयारीत व्यस्त आहे.

गंगेचे सर्व घाट, जिथे लोक खूप महिन्यांपासून गेले नाहीत, आता अंत्यसंस्कारासाठी तिथे रंग लागल्यात. हाजीपूर चौकी परिसरातील रौतापूर घाटात चारशेहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यातील बहुतेक दफन झाले आहेत. दररोज डझनहून अधिक अंत्यसंस्कार होत आहेत. वीस दिवसांपूर्वीची गणना केवळ 2 ते 3 होती. पिपरी, लंगडापूरवा, मिर्झापूर, भटपूरवा, राजपूर, कणिकमाऊ यासह दोन डझन गावातील लोक राऊतपूर घाटावर अंतिम संस्कार करण्यासाठी येतात.

अंत्यसंस्कारासाठी घाटावर लाकूड नसल्यामुळे तेथील परिस्थिती अतिशय भयावह असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जो अंत्यसंस्कार करण्याची तयारी करतो तो चिता तयार करतो किंवा मृतदेह वाळूमध्ये पुरला जातो. मात्र आता मृतदेह दफन करण्यासाठी सुद्धा जागा नाहीये. यामुळे अंतिम संस्कार करण्यासाठी येणाऱ्याना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुधवारी सुमारे 16 मृतदेह घाटावर पोहोचले. घाटापासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर सहा फूटांपेक्षा जास्त खड्डा खोदून त्यांना पुरल गेलं. लोक म्हणतात की, पुराच्या दिवसात हे मृतदेह गावाच्या सभोवताल वाहून जातील आणि त्यामुळे रोगराई पसरेल.

गंगेचे पाणी प्रदूषित होईल. एसीएम सदर सत्यप्रिया म्हणतात की, गंगेच्या काठी अंत्यसंस्कार केले जातात. जर शेकडो मृतदेह पुरण्यात आले असतील तर त्याचा तपास केला जाईल. पूर्ण अहवाल मागविला जाईल. अंतिम संस्कार करण्यासाठी ग्रामीण भागातील लोक हाजीपूर चाकी परिसरातील रौतापूर घाट येथे दाखल होतात. जेथे बुधवारी दुपारपर्यंत सोळा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. त्या मृतदेहांना ग्रामस्थांनी घाटाजवळ रिकाम्या वाळूमध्ये 13 मृतदेह पुरले. घाटावर जागा सापडली नाही तेव्हा तीन मृतदेह सुमारे 200 ते 300 मीटर अंतर राखून नवीन ठिकाणी पुरण्यात आले.

WhatsAppShare