यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून पत्नीची प्रसूती करने पडले महागात

644

तिरुपूर, दि. २६ (पीसीबी) – तामिळनाडूमधील तिरुपूर येथे यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून एका महिलेची प्रसूती घरातच करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे.

क्रिथिगा असे मृत महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्रिथिगा हिचा कार्तिकेयन सोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. क्रिथिगा एका खासगी शाळेत शिक्षिका तर तिचा पती कार्तिकेयन कपडा तयार करण्याच्या कंपनीत कामाला आहे. त्यांना तीन वर्षींची एक मुलगीदेखील आहे. त्यांच्या पहिल्या बाळाची प्रसूती रुग्णालयात झाली होती. दुसऱ्या बाळाचा जन्म घरात व्हावा अशी क्रिथिगाची इच्छा होती. यामुळे पती कार्तिकेयन याने त्याच्या दोन मित्रांसोबत मिळून घरातच क्रिथिगाची प्रसुती केली होती. विशेष म्हणजे यांच्यामधील एकाही व्यक्तीला प्रसूती कशी करावी याबद्दल काही माहिती नव्हती. यामुळे बाळाला जन्म देताच क्रिथिगाचा मृत्यू झाला.