युथ फॉर क्राईस्ट फाऊंडेशनच्या आंतर चर्च फुटबॉल स्पर्धेत पिंपरीतील रेस्टो संघाला विजेतेपद

86

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – युथ फॉर क्राईस्ट फाऊंडेशनच्या वतीने आंतर चर्च फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये एकूण १६ संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघात एक महिला खेळाडूचा सहभाग होता. त्यामुळे महिला खेळाडूंना आपली कसब दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत पिंपरी येथील रेस्टो फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले.

चिंचवड, काकडे पार्क येथील सॉकर यार्डमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. पुणे येथील सेंट चावरा फुटबॉल संघ आणि पिंपरी येथील रेस्टो फुटबॉल संघ यांच्यात स्पर्धेतील अंतिम सामना झाला. रेस्टो फुटबॉल संघाने सेंट चावरा फुलबॉल संघाचा शूट आऊटमध्ये पराभव केला. विजेत्या संघाला रोख ७ हजार ७७७ रुपये आणि करंडक, तर उपविजेत्या संघाला रोख ४ हजार ४४४ रुपये आणि करंडक देण्यात आला.

या स्पर्धेद्वारे तरूणींना प्रोत्साहन देण्यात आला. स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघात एका महिला खेळाडूचा सहभाग अनिवार्य करण्यात आला होता. त्याचप्रमाणे तरुणींसाठी डॉज बॉल स्पर्धा घेण्यात आली. त्यात निगडी, यमुनानगर येथील इन्फंट जिजस संघाने विजेतेपद, तर काळेवाडी येथील केडीसी संघाने उपविजेतेपद पटकावले.

यावेळी पुणे धर्मप्रांतचे बिशप राईट रेव्हरंड शरद गायकवाड, अॅड. सिरील दारा, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे, चिंचवड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार कदम, उद्योजक बथुवेल बळीद, विश्वास दळवी, मावळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, धर्मगुरू फिलेमोन म्हात्रे, नागेश बनसोडे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी संदेश बोर्डे, स्नेहल डोंगरदिवे, प्रशांत बनकर, सुशांत बनकर, स्नेहल गायकवाड, विशाल दौंडे, बिनु चेरियन, कुशल सोजवळ, फ्रँक पीटर, संदीप गायकवाड, संतोष साळवे, डेव्हिड श्रीसुंदर यांनी परिश्रम घेतले.