युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाच नाही; चंद्रकांत पाटलांची पलटी

98

सांगली, दि, १८ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीमध्ये आमचं सर्व ठरले आहे. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी सांगितले होते, परंतू भाजप-शिवसेना युतीचा फॉर्म्युला अद्याप तरी ठरलेला नाही, असा दावा करत चंद्रकांत पाटील यांनी पलटी मारली आहे.

औरंगाबादमध्ये दुष्काळी दौऱ्यांवर असताना चंद्राकांत पाटील यांनी पत्रकाराशी बोलतना म्हणाले होते की, युती बाबत आमचं सर्व ठरले आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी घटकपक्षाला १८ सोडणार तर १३३-१३५ जागा शिवसेना-भाजपा लढतील असे तेव्हा सांगितले होते. मात्र चंद्रकांत पाटलांनी आता फॉर्म्युलाच ठरला नाही, असे म्हणत पलटी मारली आहे.

दरम्यान, दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते सारे काही बरोबर असल्याचे दाखवत असले तरी  चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे युतीत बिघाड असल्याचे दिसून येत आहे.