‘या’ मराठी व्यक्तीची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करा; रंजन गोगोईंची शिफारस  

62

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावे, अशी शिफारस सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाकडे केली आहे.

याबाबत गोगोई यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, १७ नोव्हेंबर रोजी आपण सरन्यायाधीशपदावरून  निवृत्त होत आहोत. त्यामुळे परंपरेनुसार आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असलेल्या न्यायाधीश बोबडे यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात यावी.

दरम्यान,  गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती.  आता ते  येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.

न्या. शरद अरविंद बोबडे यांचा जन्म नागपूरमध्ये २४ एप्रिल १९५६ रोजी झाला. १९७८ मध्ये ते महाराष्ट्र बार काऊन्सिलचे सदस्य बनले. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी काम सुरु केले. मुंबई हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांची सन २००० मध्ये नियुक्त झाली. मधल्या काळात मध्य प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश त्यानंतर २०१३ मध्ये सुप्रीम कोर्टात ते न्यायाधीश झाले. न्या. एस. ए. बोबडे हे २३ एप्रिल २०२१ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदी कार्यरत असलेले दुसरे सरन्यायाधीश असतील. यापूर्वी न्या. कपाडिया हे सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर कार्यरत होते.