या पुढील काळात पाण्यावरूनच वाद होतील – चंद्रकांत पाटील

128

पुणे, दि. ९ (पीसीबी) – राज्यातील जे काही वाद आहेत, ते संपले आहेत.  या पुढील काळात पाण्यावरूनच वाद होतील. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने वागले पाहिजे,  असे  पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे.

बारामतीच्या पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणाचे तारतम्य बाळगावे, असे विधान केले होते. त्यावर बोलताना पाटील यांनी ही भूमिका मांडली आहे.  दरम्यान, पुणेकरांनी मात्र पाण्याबाबत चिंता करू नये, असे पाटील यावेळी म्हणाले.

पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी  पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.  यावेळी खासदार गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.