‘या’ कारणामुळे हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा खून

391

पुणे, दि. 22 (पीसीबी): पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल गारवामुळे त्याच्या शेजारच्या अशोका हॉटेलचा व्यवसाय होत नव्हता. त्यामुळे अशोका हॉटेलच्या चालकांनी एका सराईत गुन्हेगाराला सुपारी देवून हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. खून करण्यासाठी आरोपींना दररोज एक ते दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. उपचारादरम्यान हॉटेल चालकाचा मृत्यू झाल्याने हल्लेखोर आणि साथीदाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय 56), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय 24), सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी
(वय 21), अक्षय अविनाश दाभाडे (वय 27) करण विजय (वय 21), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय 23), गणेश मधुकर साने (वय 20) आणि निखिल मंगेश चौधरी (वय 20, सर्व रा. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.