‘या’ कारणामुळे खासदार उद्यनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर?  

61

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण पक्षप्रवेशासाठी उदयनराजेंनी काही अटी समोर ठेवल्या आहेत.  त्यात सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी. पोटनिवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी, अशी त्यांची मागणी  आहे.  त्यामुळेच त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

उदयनराजे  यांनी मंगळवारी तातडीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षांतरांच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर  धरला. परंतु उदयनराजे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची  भेट घेऊन आपल्या पक्षांतरांबाबत अटी समोर ठेवल्या. त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला.

दरम्यान,  उदयनराजे यांनी पुण्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीनंतर उदयनराजे पक्षांतराचा निर्णय बदलणार असल्याचे  सांगितले जात होते.  तसेच कार्यकर्त्यांनी  देखील आहे तिथेच स्थिर राहण्याचा सल्ला उदयनराजे यांना दिला होता.  भाजपमध्ये जाणे धोक्याचे ठरू शकते,  असेही कार्यकर्त्यांनी उदयनराजे यांना सांगितले होते.