…….. ‘या’ कारणांमुळे त्याने केली ज्येष्ठ नागरिकास लोखंडी रॉडने मारहाण

76

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – घरासमोर राहणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक केल्याने मुलीने विचारपूस केली. त्यावरून एकाने शिवीगाळ केली. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करणाऱ्याने लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 26) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड येथे घडली.

महादेव वाघमारे (रा. पत्राशेड, लिंकरोड, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मच्छिंद्र निवृत्‍ती मनोहर (वय 66, रा. पत्राशेड, लींकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची मुलगी पत्राशेड येथे समोरासमोर राहतात. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीच्या घरावर दगड मारला. याबाबत फिर्यादी यांच्या मुलीने आरोपीकडे विचारपूस केली. त्यावरून आरोपी महादेव याने फिर्यादी यांच्या मुलीला शिवीगाळ केली. फिर्यादी हे भांडण सोडवण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. त्यानंतर बघून घेण्याची धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare