‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये लाखाचे ७२ लाख

170

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. अल्पकालिन आणि दिर्घकालिन गुंतवणूक करण्यावर सध्या गुंतवणूकदार भर देत आहेत. अशात पेनी स्टाॅक हा एक चांगला पर्याय म्हणून समोर आला आहे. पेन्ही स्टाॅक हे कमी मुल्य असलेले स्टाॅक असतात आणि स्वस्त देखील असतात. असाच एक स्टाॅक सध्या गुंतवणुकदारांना लाखो रूपयांचा फायदा देत आहे.

गोपाला पाॅलीप्लास्टचा शेअर गुंतवणुकदारांना फायदा देत आहे. गोपाला पॉलीप्लास्ट हा असाच एक स्टॉक आहे. गोपाला पॉलीप्लास्टचा शेअर आर्थिक वर्ष 2022 मध्ये 9.10 रुपयांवरून 2022 मध्ये 650 रुपयांपर्यंत वाढला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत या स्टॉकमध्ये 7000 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर 1 लाख रूपये गुंतवले असते तर त्याला तब्बल 72 लाख रूपयांचा रिटर्न्स मिळाला असता.
गोपाला पाॅलीप्लास्ट शेअरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं पेनी स्टाॅकचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. 6 महिन्यांपूर्वी कोणी गोपाला पाॅलीप्लास्टमध्ये 1 लाख रूपये गुंतवले असते तर त्याचे 23.6 लाख रूपये झाले असते. गोपाला पाॅलीप्लास्टच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी पेनी स्टाॅकमध्ये गुंतवणूक करणं हे थोडं धोक्याचं मानलं जातं.

दरम्यान, पेनी स्टाॅकमध्ये गुंतवणूक करणं हे सोपं आहे. पण आपली निवड चुकली तर त्याचा फटका थेट गुंतवणुकदाराला होतो. परिणामी या पेनी स्टाॅकमध्ये गुंतवणूक करताना काळजीपुर्वक करावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.