…यासाठी आगामी निवडणुका महत्त्वाच्या ! – अजित पवार   

424

भिवंडी, दि. १४ (पीसीबी) – भाजप सरकारच्या काळात देशात  हुकुमशाहीकडे  वाटचाल सुरू आहे.  मागील दाराने आणीबाणी आणली जात आहे.  असहिष्णूतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी  निवडणुका   महत्त्वाच्या आहेत, असे  राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार यांनी आज (सोमवार) येथे म्हटले आहे.

भिवंडी येथील जाहीर सभेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील भाजप–शिवसेना सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला.  वाढत्या महागाईमुळे जगणे मुश्किल झाले  असून  ग्राहक आणि शेतकरी समाधानी नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही  कर्जमाफी दिली,  त्यांच्या अडचणीला धावून गेलो. परंतु, हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, असा घणाघात पवार यांनी घातला.

बेरोजगारांना नोकऱ्यांना मिळत नाहीत.  शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी  सरकारकडे  पैसे नाहीत. परंतु, बुलेट ट्रेनला द्यायला यांच्याकडे पैसे आहेत. आधी येथील समस्यांचे निराकरण करा. नको ती सोंगं करु नका, अशी तोफ पवार यांनी सरकारवर डागली. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला मोदींना हटवा. सेना -भाजपचे सरकार घालवा, असे आवाहन करून पवारांनी जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.