याला काय म्हणावे… लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीबाबत असे काही घडले…

109

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना तरुणाने तरुणीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यासाठी तरुणीने नकार दिला असता तरुणाने तिला मारहाण करून जखमी केले. ही घटना 6 जानेवारी रोजी पहाटे चार ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत हिंजवडी परिसरात घडली.

योगेश्वर शशिकांत पगारे (वय 25, रा. मारुंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी मित्र आहेत. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 6 जानेवारी रोजी योगेश्वर याने तरुणीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तरुणीची इच्छा नसल्याने तिने यासाठी नकार दिला. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. योगेश्वर याने किचनमधील स्टिक तव्याने तरुणीच्या हातावर, पोटावर मारले. रात्री प्लास्टिकच्या पेनने तरुणीच्या हातावर मारून तिला जखमी केले. पोलिसांनी योगेश्वर याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.